शिक्षण
July 10, 2026
शैक्षणिक गुणवत्ता पुरस्कार सोहळा २०२६
वीरशैव लिंगायत समाज पालघर तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही इयत्ता १०वी आणि १२वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित केला जाणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ आहे. विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका आणि आवश्यक कागदपत्रे समाज कार्यालयात जमा करावीत. पात्र विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शिष्यवृत्ती आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येईल.